Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रअखेर भाजप सरकारने केलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या रद्द

अखेर भाजप सरकारने केलेल्या महामंडळाच्या नियुक्त्या रद्द

Dhananjay Mundeमुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत येणा-या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळस, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ यांसह इतर समित्यांचे अध्यक्ष,संचालकांच्या नियुक्त्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाकडून रद्द करण्यात आले आहेत.

तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. नव्याने लवकरच सर्व महामंडळाच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत. विभागाच्या योजना व जबाबदा-यांची चोख प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व पदी नव्या नेमणूका करण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments