Sunday, September 15, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकऱ्यांची कर्जमाफी योजना फसवी - अशोक चव्हाण

शेतकऱ्यांची कर्जमाफी योजना फसवी – अशोक चव्हाण

मुंबई – सरकारची शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफी योजना फसवी आहे, सर्व प्रश्नांवर सरकार अपयशी ठरले आहे. तीन वर्षांच्या कार्यकाळात भाजप सरकारने जनतेची निराशा केली अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांच्यासोबत विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाणही उपस्थित होते.

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जनतेचा जनआक्रोश दिसून आला आहे. गेल्या तीन महिन्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. येत्या ३१ ऑक्टोबरला माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आहे. तेव्हा इंदिरा गांधींना अभिवादन करून जनआक्रोश मोर्चा अहमदनगरला काढणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. महाराष्ट्राततल्या सर्व जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच ८ नोव्हेंबरला नोटबंदीला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस आम्ही काळा दिवस पाळणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. या आंदोलनामध्ये पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होणार असल्याची माहितीही चव्हाणांनी दिली.  कर्जमाफी ही शेतकऱ्यांची अपमान योजना आहे. जाचक अटी शर्तीं एवढ्या टाकल्या आहेत की, अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये असे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी म्हटले.

ज्यांचे नावच कर्जमाफीच्या यादीत नाही, त्या उस्मानाबादच्या शेतकऱ्यांना ही प्रमाणपत्र दिले असल्याचा खुलासा चव्हाणांनी करत सरकारची कर्जमाफी फसवाफसवी असल्याची टीका केली.  या शासनाला सरकारी कारभार हाकने जमत नाही, कर्जमाफीसाठी अनेकदा जीआर बदलण्याची यांच्यावर वेळ आली मग हे प्रशासन कसे चालवणार असा खोचक सवाल करत सरकारची ही कर्जमाफी फसवाफसवी असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच कापसाची ऑनलाईन खरेदी होऊ नये याची त्यांनी मागणी केली आहे.

कर्जमाफीच्या घोळला बँका जबाबदार नाहीत, शेतकऱ्यांच्या आधारकार्डावर मोठ्या नेत्यांनी आपल्या संस्थांनाही कर्ज घेतली असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला. तसेच  कर्जमाफीमध्ये अनेक बोगस नावे आली आहेत. त्या बोगस लाभ धारकांची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही चव्हाण यांनी केली.
कर्जमाफीच्या नावावर या सरकारने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा अवमान केला. सरकारने यंत्रणा असताना त्यांनी कार्यक्षम पणे वापरल्या नाहीत, त्यामुळे कर्जमाफीत गोंधळ झाला आहे. असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments