मुंबई: मनसेच्या गुंडगर्दीविरोधात सर्वांना उभं राहवं लागेल. हप्तेखोरीच्या रॅकेटमध्ये मनसेचे काही नेतेही आहेत असा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष माजी खासदार संजय निरुपण यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
मालाड येथे फेरीवाले आणि मनसे कार्यकर्ते यांच्यात शनिवारी झालेल्या हल्ला प्रकरणी निरुपम यांच्यावर चिथवणी दिल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आला होता. निरुपम यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मनसेची गुंडगर्दी वाढली असून गुजराती,कधी जैन,उत्तरभारतीय लोकांच्या विरोधात गुंडगर्दी करतात. ही गुंडगर्दी रोखण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. मुंबईतील कोणताही फेरीवाला अनधिकृत नसून महापालिका,सरकार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी का करत नाही असाही प्रश्न उपस्थित केला. महापालिका आयुक्त अजय मेहता या सर्व घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी केला. फेरीवाला धोरण लागू केले तर हप्तेखोरी बंद होईल यामुळे दिरंगाई केली जात आहे.
ज्या ठिकाणी फेरीवाले कमजोर आहेत त्या ठिकाणी ते मार खातील परंतु ज्या ठिकाणी फेरीवाले जास्त आहेत त्या ठिकाणी ते फेरीवाले मनसेच्या मनसेच्या गुंडाना स्व: रक्षणासाठी मारतीलही. आम्हाला हिंसा पसंद नाही. परंतु जो मनसेचा कार्यकर्ता जखमी आहे तो लवकर बरा होवो असेही यावेळी निरुपम यांनी सांगितली. फेरीवाला प्रकरणात मी स्वत: न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. फेरीवाले मुंबईतच नव्हे तर देशात,विदेशात प्रत्येक ठिकाणी आहेत. ते काही चुकीचे काम करत नाहीत. त्यांना व्यवस्थित जागा उपलब्ध करुन दिली तर असे प्रकार होणार नाही. भाजपाचे नेते फेरीवाल्यांना मारहाण करतात त्यांच्या विरोधातही पालिस गुन्हे दाखल करत नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे हे सांगण्याची गरज नाही. फेरीवाल्यांच्या अडचणीमध्ये मी जाईल. गरिब व्यक्तीला अडचणीत जाणे हा गुन्हा नाही. माझ्यावर कीतीही गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही असेही निरुपम यांनी सांगितले.