Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रशिवसेना बाहेर पडली तरी सरकावर काही परिणाम होणार नाही-चंद्रकांत पाटील

शिवसेना बाहेर पडली तरी सरकावर काही परिणाम होणार नाही-चंद्रकांत पाटील

जळगाव: शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकारवर काही परिणाम होणार नाही, विदाऊट शिवसेनाही सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं धक्कादायक वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटीलांनी केलं आहे. काल जळगावमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे विधान केलं. सध्या ते जळगाव दौऱ्यावर आहेत.

कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकणार नाही , आणि पडलीच तरी सरकारवर परिणाम होणार नाही ,सरकार वाचविण्याची यंत्रणा सरकारकडे उभी असेल , विदाउट शिवसेनासुद्धा सरकार पाच वर्षांचा काळ पूर्ण करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगून एक प्रकारे शिवसेनेला सज्जड इशाराच दिला असल्याचे मानलं जात आहे.

‘मुख्यमंत्री फडणवीसच’
तसंच नाना पाटोळे यांनी चंद्रकांत पाटील यांचे वाढते वर्चस्व पाहता मुख्यमंत्री देवेन्द्र फडणीस कि चंद्रकांत पाटील असा प्रश्न उपस्थित केल्याचं विचारलं असता मुख्यमंत्री फडणीसच असून तेच संपूर्ण राज्य चालवतात आम्ही सर्व त्यांचे सहकारी आहोत ,त्यांना मदत करत असताना ज्या गोष्टी आम्ही करतो त्यामुळे काहींना असं वाटतं की वेगळे सत्तास्थान निर्माण झाले की काय मात्र देवेंद्र फडणीस यांना जोपर्यंत असं वाटत नाही तोपर्यंत मला काळजी करण्याचं कारण नाही. चंद्रकांत पाटील यांना जळगावकडे येत असताना अजिंठा ते जळगाव दरम्यान खराब रस्त्याचा अनुभव आल्याची कबुली त्यांनी दिली आहे. रस्त्याची अवस्था पाहून आपण संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांना तातडीने हा मार्ग दुरुस्तीच्या सूचना दिल्या असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments