Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रएकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?

एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?

मुंबई : मंत्रीपदासाठी सध्या तिष्ठत असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची मंगळवारी औरंगाबाद विमानतळावर धावती भेटझाली. खडसे काही दिवसांपासून मंत्रीपद गेल्यामुळे पक्षावर नाराज आहेत. खडसे हे काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

औरंगाबाद येथील काँग्रेस कार्यकर्ता शिबिर आटोपून दिल्लीकडे निघालेले मोहन प्रकाश हे विमानाच्या प्रतीक्षेत विमानतळावर वेटिंग रूममध्ये बसून होते. तर औरंगाबाद येथील एका भाजपा कार्यकर्त्याचा वाढदिवस आटोपून खडसे हेदेखील दिल्लीला जाण्यासाठी विमानतळावर आले. खडसे आणि मोहन प्रकाश हे दोघेही वेटिंग रूममध्ये समोरासमोर बसल्याने उभयतांमध्ये ‘हवा-पाण्यावर’ चर्चा झाली. खडसे म्हणाले, मोहन प्रकाश आणि मी एकाच विमानाने दिल्लीला आलो. मात्र आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. आम्ही दोघेही ‘वेटिंग रूम’मध्ये काही काळ होतो, पण तिथेही नमस्कारापलीकडे काही घडले नाही. माझ्याबाबत सध्या अनेकांना कळवळा आला असल्याने ते अशा भेटीला राजकीय भेटीचे स्वरूप देत असल्याचे खडसे यांनी सांगितले. मात्र खडसे भाजपाला कोणत्याही क्षणी रामराम करुन काँग्रेसमध्ये दाखल होऊ शकतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments