Placeholder canvas
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रसंदीप देशापांडेसह आठ मनसैनिकांचा कारागृहात मुक्काम वाढला

संदीप देशापांडेसह आठ मनसैनिकांचा कारागृहात मुक्काम वाढला

मुंबई – काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडेसह इतर आठ जणांचा जामीन अर्ज किला कोर्टानं बुधवारी फेटाळला. १८ तारखेपर्यंत न्यायलयीन कोठडीत राहणार आहे. यामुळे सर्व आरोपींचा मुक्काम ऑर्थर रोड कारागृहातच असणार आहे.

फेरीवाल्यांच्या प्रश्नावरून काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सुरू झालेल्या राडेबाजीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( १ डिसेंबर ) रोजी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान येथील मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करत तोडफोड केली होती. याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली होती. शनिवारी २ डिसेंबर रोजी किला कोर्टात उपस्थित केले असता त्यांना ४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. सोमवारी पोलिस कोठडी संपल्यानंतर सर्व आरोपींना १८ डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ६ डिसेंबर रोजी जामीनासाठी आरोपींकडून अर्ज करण्यात आला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावल्याने सर्व आरोपींचा मुक्काम १८ डिसेंबर पर्यंत आर्थर रोड कारागृहाताच असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments