Placeholder canvas
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपा कार्यालयासमोर बॅनर; येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना दिल्या जातात नोटीस

भाजपा कार्यालयासमोर बॅनर; येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना दिल्या जातात नोटीस

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावल्यानंतर शिवसेनेकडून संतप्त प्रतिक्रीया उमटली. खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद भाजपावर हल्ला चढवला होता. तर शिवसैनिकांकडून ईडी कार्यालयाबाहेर भाजपाचं बॅनर लावण्यात आलं. या बॅनरनंतर भाजपाच्या प्रदेश कार्यालयाबाहेरही ईडी कार्यालय असल्याचं बॅनर लावण्यात आलं आहे.

शिवसैनिकांनी सोमवार २८ डिसेंबर रोजी ईडीच्या कार्यालयाबाहेर भाजपा प्रदेश कार्यालय असल्याचं बॅनर लावलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा भाजपाच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयाबाहेर अशाच स्वरूपाच बॅनर लावण्यात आलं. ते कुणी लावलं हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, शिवसैनिकांनी लावले असावे, असं बोललं जात आहे. भाजपा प्रदेश कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या बॅनरवर ‘अमलबजावणी संचालनालय’ असं सुरूवातीलाच लिहिलं आहे. त्यानंतर “येथे भाजपाविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात,” असं लिहिलेलं आहे.

पत्रकार सोहित मिश्रा यांनी या बॅनरचा फोटो ट्विट केला आहे. शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांचीही ईडीकडून चौकशी सुरू आहे. त्यांची चौकशी सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे शिवसेना संतापली असून, संजय राऊत यांनीही आक्रमक पवित्रा घेत भाजपाला धारेवर धरलं होतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments