Tuesday, June 16, 2026
HomeदेशBSNL चा प्लॅन, 1095 GB डेटासह ‘फ्री’मध्ये देणार Eros Now चं सबस्क्रिप्शन

BSNL चा प्लॅन, 1095 GB डेटासह ‘फ्री’मध्ये देणार Eros Now चं सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने आपला 1,999 रुपयांचा वार्षिक प्लॅन अपडेट केला आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवांच्या बाबतीत जास्त बदल झालेला नाही, पण युजर्सची आजची गरज ओळखून एक मोठा बदल मात्र नक्की झालाय.

BSNL ने नवीन अपडेटमध्ये कॉलिंग आणि डेटाच्या बाबतीत कोणताही बदल केलेला नाही. पण, आता Lokdhun आणि Eros Now यांचं युजर्सना फ्री सबस्क्रिप्शन दिलं जात आहे.

यापूर्वी या प्लॅनमध्ये Lokdhun चं एका वर्षासाठी आणि Eros Now चं 60 दिवांसाठी सबस्क्रिप्शन मिळायचं. पण आता नव्या अपडेटनंतर Lokdhun चं 60 दिवसांसाठी आणि Eros Now चं सबस्किप्शन 365 दिवसांसाठी भेटेल. एक जानेवारी 2021 पासून नवीन अपडेट लागू होईल.

 

वेब डेस्क
वेब डेस्क
वेब डेस्क खाते ब्रेकिंग न्यूज, ताज्या घडामोडी, हेडलाईन्स, कॉपी एडिटिंग आणि डिजिटल प्रकाशनाची जबाबदारी सांभाळते. अचूक, जलद आणि वाचकाभिमुख बातम्या डिजिटल माध्यमांद्वारे पोहोचवणे हे या खात्याचे कार्य आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments