Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांनी 'वर्षा' निवासस्थान सोडलं

देवेंद्र फडणवीसांनी ‘वर्षा’ निवासस्थान सोडलं

Devendra Fadnavis leave official residence of Chief Minister 'Varsha Bungalow' residenceमुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडला आहे. आज सामानाची आवराआवर सुरु असून 15 कामगारांची टीम सकाळपासून सामानाची पॅकींग करत आहेत. फडणवीस शासकीय निवासस्थान स्विकारतात की खासगी सदनिकेमध्ये वास्तव्यास जातात हे अद्यापही स्पष्ट झालं नाही.

देवेंद्र फडणवीस यांचे सरकार 79 तासानंतर कोसळले. त्यानंतर गुरुवारी महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार गुरुवारी अस्तित्वातं आलं. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज शुक्रवारी पदभार स्विकारणार आहेत. त्यामुळे फडणवीसांनाही शासकीय निवासस्थान सोडावं लागणार आहे.

आधी फडणवीसांनी वर्षा बंगल्यात वास्तव्यासाठी तीन महिने मुदतवाढ मागितली होती. परंतु ते आजचं निवासस्थान सोडणार आहेत. फडणवीस आता विरोधी पक्ष नेता म्हणून भूमिका बजावणार आहेत. विरोधी पक्ष नेत्यांना शासकीय निवासस्थान मिळत असतो. मात्र, फडणवीस तो स्विकारणार आहेत की नाही हे अद्यापही स्पष्ट झालं नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments