मुंबई: मुंबईतील फेरीवाल्यांवरुन पेटलेलं राजकारण भडकणार असल्याचं चित्र आहे. कारण आता काँग्रेसकडून फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस येत्या बुधवारी म्हणजेच १ नोव्हेंबरला दादरमध्ये मूक मोर्चा काढणार आहे. फेरीवाल्यांना समर्थन देण्यासाठी ‘फेरीवाला सन्मान मार्च’ काढण्यात येईल. दादरमध्ये मराठी फेरीवालेदेखील आहेत, मात्र सध्या ते दहशतीत आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढणार असल्याचं मुंबई काँग्रेसकडून सांगण्यात आलं.
काँग्रेस फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार!
RELATED ARTICLES