Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री राजकीय दहशतवादी; काँग्रेसचा आरोप

मुख्यमंत्री राजकीय दहशतवादी; काँग्रेसचा आरोप

मुंबई: भीमा कोरेगाव प्रकरणात कोणावरही गुन्हे दाखल करणार नाही. जे नुकसान झालं त्याची भरपाई देण्यात येईल. अशी तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली होती. मात्र तो शब्द पाळला नाही. कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली महाराष्ट्रभर अनेकांची धरपकड करण्यात आली. अनेक तरुणांवर गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. आरएसएसच्या सांगण्यावरून ही कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी केला. विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी या कारवया केल्या जात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राजकीय दहशतवादी घोषित करायला हवं, असं मत वाघमारे यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रात या अगोदरही मोर्चे निघाले. मात्र अशी परस्थिती कधीही निर्माण झाली नव्हती. सूडभावनेनं कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे बंद झाला त्यानंतर ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यांच्यावरील  गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच ज्यांचे नुकसान झाले त्यांना नुकसानीची भरपाई मिळायला हवी.  सरकारने गुन्हे मागे घेतले नाही तर काँग्रेस पक्ष आंदोलन करेल, असा इशारा यावेळी वाघमारे यांनी दिला आहे.

कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली सात ते आठ हजार युवकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र ज्यांनी ही घटना (कोरेगाव हिंसाचार) घडवली त्या मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर कारवाई होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे यांच्या आदेशावरून काम करतात. त्यामुळे त्यांना अटक करण्याची कारवाई होत नसल्याचा आरोप वाघमारेंनी केला आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मुख्यमंत्र्यांना धर्मसत्ता ही राजसत्तेपेक्षा श्रेष्ठ आहे. तसं त्यांनी जाहीरही केलं होते. त्याला अनुसरुनच मुख्यमंत्री वागत आहेत. आरएसएसनं भाडोत्री गुंडाकडून हे प्रकरण घडवलं आहे. महाराष्ट्रात आरएसएसचं हेडकोर्टर आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अशा घटना जास्त घडत असतात असंही यावेळी वाघमारे म्हणाले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments