Placeholder canvas
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रविधान परिषदेसाठी भाजपाच्या प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

विधान परिषदेसाठी भाजपाच्या प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई: विधान परिषदेच्या पोटनिवडणूकीसाठी रिक्त जागेवर भाजपाचे प्रसाद लाड यांचा उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,राजपुरोहित,मंत्री प्रकाश मेहता यांच्यासह शिवसेनेचे नेते उपस्थित होते.

राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर ७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. शिवसेनेच्या विरोधानंतर भाजपाने राणे यांना भाजपाने उमेदवारी नाकारुन लाड यांना उमेदवारी दिली. भाजपाचे १२२ आणि शिवसेनेचे ६३ आमदार आहेत. युतीकडे एकुण १८८ संख्याबळ होते. यामुळे लाड यांचा विजय निश्चित असून शिवसेनेने समर्थन दिल्यामुळे लाड यांचा मार्ग सुकर झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments