Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरातमध्ये भाजपचा नैतिक पराजयः खा. अशोक चव्हाण

गुजरातमध्ये भाजपचा नैतिक पराजयः खा. अशोक चव्हाण

मुंबई : पंतप्रधानांसह निम्मे केंद्रीय मंत्रीमंडळ, तेरा राज्याचे मुख्यमंत्री, मदतीला सरकारी यंत्रणा, आणि प्रशासन या सर्वांविरोधात राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी गुजरातचा निकाल उत्साहवर्धक असून गुजरात मध्ये भाजपचा नैतिक पराजय झाला आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

पंतप्रधानापासून भाजप अध्यक्षापर्यंत अनेक मंत्री व भाजप नेत्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन काँग्रेस अध्यक्ष आणि नेत्यांवर केलेली टीका, गलिच्छ प्रचार, पोलीस,प्रशासनाला हाताशी धरून  निवडणुका जिंकण्यासाठी केलेल्या डर्टी ट्रिक्स यामुळे १५० जागा जिंकण्याच्या वल्गना करणा-या भाजपाला तीन अंकी आकडा ही गाठता आलेला नाही. भाजपने आपल्या प्रचारात कुठेही विकासाचा उल्लेख केला नाही. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर खोटे नाटे आरोप केले.  औरंगजेब आणि पाकिस्तान यांच्या नावाचा वापर करून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा पूरेपूर प्रयत्न केला. याउलट या सर्वांवर मात करत काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर गुजरात विधानसभेची निवडणूक लढवली आणि गेल्या निवडणुकीपेक्षा २० जागा जास्त जिंकल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या मतांमध्ये १० टक्क्यांची वाढ झाली आहे. या निवडणुकीमध्ये राहूल गांधी एक लढवय्या योध्दा म्हणून समोर आले आहेत. हा निकाल देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक असून आगामी राज्य आणि देश पातळीवरील निवडणुकांमध्ये राहूल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष भाजपला पराभवाची धूळ चारल्याशिवाय राहणार नाही असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

गुजरातचे निकाल हा भाजपसाठी इशाराः विखे पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसमुक्त भारताची वल्गना केली होती. पण त्यांच्या गृहराज्यातच भाजपला पुन्हा सत्ता स्थापण्याची निसटती संधी मिळाली, हा मतदारांचा कौल भाजपने लक्षात घेतला पाहिजे. हा जनतेचा इशारा आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.  

गुजरात विधानसभा निवडणुकीत निकालांबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसच्या किमान १६ जागा वाढतांना दिसत आहेत. काँग्रेसला झालेले मतदान ३८ टक्क्यांवरून ४१.५ टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे पक्षाच्या कामगिरीत भरीव सुधारणा आहे आणि यामध्ये काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाचे मोठे श्रेय आहे.

गुजरातेत भाजपची प्रचंड दहशत असताना खा. राहुल गांधी यांनी संपूर्ण गुजरात पालथा घातला. जनतेने त्यांना साथ दिली. कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. काँग्रेसची संघटना मजबूत झाली आणि संपूर्ण देशात याचा सकारात्मक परिणाम झाला. त्यामुळे भलेही गुजरातमध्ये सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली नसेल, पण संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याचे अनुकूल परिणाम आपल्याला नजीकच्या काळात दिसून येतील, असेही विरोधी पक्षनेते म्हणाले.

या निकालाने भाजपविरोधात नाराजीची लाट तीव्र होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपला मिळालेल्या जागा आणि मतदान मोठ्या फरकाने कमी झाल्याकडेही विखे पाटील लक्ष वेधले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments