Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रभाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही : सुधीर मुनगंटीवार

भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नाही : सुधीर मुनगंटीवार

BJP won't claim power : Sudhir Mungantiwar
मुंबई : भाजप आज सत्ता स्थापनेचा दावा दाखल करणार नाही. राज्यपालांशी चर्चा करु त्यानंतर निर्णय घेऊ. असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीवर मुलाखतीत व्यक्त केले.

भाजपला अल्पमतातील नव्हे तर स्थिर सरकार द्याचे आहेत. त्या दृष्टीकोनातून आम्ही विचार करीत आहोत. शिवसेनेला सोबत घेऊनच सरकार स्थापन करण्याची आमची इच्छा आहे. आज राज्यपालांना आम्ही भेटणार आहोत. स्थिर सरकार देण्याबाबत राज्य घटनेमध्ये काय तरतुदी आहेत त्या दृष्टीने आम्ही राज्यपालांशी चर्चा करणार आहोत. सत्ता स्थापनेचा दावा मात्र केला जाणार नाही असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. काँग्रेस धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. शिवसेनेला आता पाठिंबा दिला तर आयुष्यभर बाहेर बसावे लागेल असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे दोन्ही काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. जनतेनं युतीला कौल दिला आहे त्यामुळे युतीचंच सरकार स्थापन होईल. त्याचदृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments