मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार भाई जगताप विरुध्द भाजपा असा सामना रंगला आहे. विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर अमृता यांनी दिलेल्या उत्तरावरुन सध्या भाई जगताप हे चर्चेत आहेत. मात्र आता भाई जगताप यांच्याविरोधात भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव निलेश राणे यांनी ट्विटरवरुन निशाणा साधला आहे. भाई जगताप हे टपोरी असल्याची टीका निलेश राणे यांनी केली आहे.
भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक
“भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्यामुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं,” असं ट्विट निलेश राणेंनी केलं आहे.
भाई जगताप तो टपोरी आहे ज्याला ‘भाई‘ बनायचं होतं पण डरपोक असल्या मुळे त्या क्षेत्रात पण मागे राहिला. ज्या माणसाने स्वतःचं नाव ‘अशोक‘ बदलून ‘भाई‘ केलं असा माणूस काय लायकीचा आहे लक्षात येऊ शकतं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 24, 2021
भाई जगताप विरुद्ध अमृता फडणवीस…
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप केला होता. यावरुन विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे देखील कमालीचे आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं.
मात्र फडणवीस यांना उत्तर देताना मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असणाऱ्या भाई जगताप यांनी अमृता फडणवीस यांच्यासंदर्भातील मुद्द्यावरुन त्यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुंबई पोलिसांची खाती देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बायकोच्या बँकेत कशाच्या आधारावर वर्ग केली होती. याचं उत्तर द्यावं’, असं भाई जगताप म्हणाले होते.
“ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही
या टीकेला उत्तर देताना अमृता यांनी ट्विटरवरुन, “ए भाई, तू जो कोण असशील, माझ्यावर बोट उचलायचं नाही. पोलिसांची खाती राज्यात यूटीआय बँक/अॅक्सिस बँकेला योग्यता पाहून दिली होती! लक्षात ठेव, सरळ रस्त्यानं चालणाऱ्याला डिवचायचं नाही!”, अशा शब्दात उत्तर दिलं होतं.