Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत भाजपला धक्का,चार नगरसेवकांनी शिवबंधन बांधले!

नवी मुंबईत भाजपला धक्का,चार नगरसेवकांनी शिवबंधन बांधले!

Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई: नवी मुंबई महापालाकी निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजीनामा दिलेल्या भाजपच्या चार नगरसेवक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधणार आहेत. हा भाजप आणि नवी मुंबईचा गड राखणाऱ्या गणेश नाईकांसाठी मोठा धक्का आहे.

सुरेश कुलकर्णी, राधा कुलकर्णी, संगीता वास्के, मुद्रिका गवळी अशी राजीनामा दिलेल्या नगरसेवकांची नावं आहेत. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असताना भाजप नेते गणेश नाईक यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबईच्या राजकारणावर आणि महापालिकेवर गेली अनेक दशकं एकछत्री साम्राज्य गाजवणारे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या साम्राज्याला सुरुंग लागताना दिसत आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा दिला. हे सर्व नगरसेवक शिवसेनेसोबत जाणार आहेत.

गणेश नाईक यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती. महापालिकेतल्या ५० नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. नवी मुंबई महापालिकेत गेली अनेक वर्ष ही राष्ट्रवादीची सत्ता आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांआधी नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भारतीय जनता पक्षाचं राज्यस्तरीय अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाच्या निमित्ताने भाजप विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली. चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी सूत्रं हाती घेतली. त्यानंतर झालेल्या भाषणात त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. अगदी या अधिवेशनाच्या २४ तासांच्या आत भाजपच्या नगरसेवकांनी राजीनामा दिला होता.

नाईक हे आपल्या सर्वच नगरसेवकांसह भाजपमध्ये आल्याने मुळ भाजपच्या असलेल्या नगरसेवकांमध्ये असंतोषाची भावना आहे. आपल्याला डावललं जातेय अशी त्यांची भावना असून त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं आहे. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरेश कुलकर्णी यांचे कौतुक केले होते. तसेच तुर्भेमधील झोडपट्टीला एसआरए लागू करण्याबाबत पावले उचलली जातील, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या नवी मुंबईत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला होता. या मेळाव्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही पक्षाच्या नेत्यांनी गणेश नाईक यांना आव्हान दिलं होतं. त्यामुळे नवी मुंबईवरील नाईकांचे साम्राज्य संपुष्टात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments