Placeholder canvas
Tuesday, May 7, 2024
Homeमहाराष्ट्र...तर ट्रम्प यांच्या बाजूला सनी लिओनीला उभं करा

…तर ट्रम्प यांच्या बाजूला सनी लिओनीला उभं करा

Sunny Leone Donald Trump,Sunny Leone, Donald Trump,Sunny, Leone, Donald, Trump

मुंबई : माझ्या स्वागतासाठी भारतामध्ये १ कोटी लोक उपस्थित राहतील,’ असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. त्यांच्या या दाव्यानंतर चित्रपट दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी उपरोधिकपणे उत्तर दिलं आहे. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी देशातील १ कोटी लोक येऊ शकतात. त्यांच्या बाजूला सनी लिओनीसह अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, शाहरुख खान, कतरिना कैफ, दीपिका पदुकोण यांना उभं करा”, असं ट्विट राम गोपाल वर्मा यांनी केलं.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला उद्यापासून सुरुवात होत आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या सन्मानार्थ ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रम अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे.

ट्रम्प यांच्या दौ-यावर १०० कोटीपेक्षा जास्त खर्च होत आहेत. त्यामुळे या दौ-याची मोठी चर्चा होत आहे. विशेष म्हणजे या खर्चाबाबत काँग्रेसह विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे अहमदाबादमध्ये झोपडपट्टी लपवण्यासाठी भिंत उभारण्यात आली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचा दौरा या भिंतीमुळे मोठ्या प्रमाणात गाजत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments