महत्वाचे…
१.परिस्थितीचा फायदा घेऊन मोबाईल शॉपी चालविणाऱ्या तरूणाने वारंवार केला अत्याचार २.अल्पवयीन मुलगी सहा महिन्यांची गर्भवती ३. पीडितेने पोलिसां समोर केले कथन
बीड : परिस्थितीचा फायदा घेऊन एका अल्पवयीन भिकारी युवतीवर मोबाईल शॉपी चालविणाºया तरूणाने वारंवार अत्याचार केला. यातून ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
शेख जावेद शेख सलिम (कबाडगल्ली) असे त्या नराधमाचे नाव आहे. पीडिता ही केवळ १५ वर्षांची आहे. तिची आई बशिरगंज परिसरात भिक मागून पोट भरते. तिच्यासोबत तिची मुलगीही असे. मुलगी मोठी असल्याने तिच्यावर याच भागातील जावेदचा डोळा गेला. तिच्या परिस्थितीचा फायदा घेत त्याने मागील उन्हाळ्यापासून ते आजपर्यंत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. यातून गर्भवती राहिली.
दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यांनी पीडिता व तिच्या आईची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला विश्वास देत पोलिसांनी तिच्याकडून संपूर्ण माहिती घेतली. यावेळी तिने आपल्यावर जावेदने वारंवार अत्याचार केल्याचे सांगितले. त्यानंतर जावेदवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जावेदला तात्काळ बशिरगंजमध्ये ताब्यात घेतल्याचे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद सुलेमान यांनी सांगितले.