Saturday, October 12, 2024
Homeदेशहार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा

हार्दिक पटेलने दिला काँग्रेसला पाठिंबा

महत्वाचे…
१. गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला २. अधिकृत घोषणा लवकरच ३. पाटीदार आंदोलन समितीचे अनेक नेते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार


नवी दिल्ली – पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी हार्दिक पटेलने काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. पाटीदार आंदोलन समितीचे अनेक नेते काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणार हे आता निश्चित झालं आहे. हार्दिक पटेलशी झालेल्या चर्चेनंतर पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला, ते काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.  

हार्दिक पटेलच्या या घोषणेमुळे गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे बळ वाढणार आहे. मात्र हार्दिक पटेलने स्वत: याबाबत घोषणा केलेली नाही. मात्र पाटीदार आंदोलन समितीचे संयोजक ललित वसोया यांनी पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याच्या केलेल्या घोषणेमुळे हार्दिक पटेलने अप्रत्यक्षपणे काँग्रेसला पाठिंबा दिल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments