Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्ररेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीला बंदचा फटका

रेल्वे, मेट्रो आणि रस्ते वाहतुकीला बंदचा फटका

गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखताना आंदोलनकर्ते

मुंबई: भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभरातील दलित संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे आज मुंबई, पुणे, नाशिक या प्रमुख शहरांसह राज्यभरात मोठी आंदोलने होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आहे. भीमा कोरेगाव हिंसाचाराचे पडसाद कालपासूनच राज्याच्या अनेक भागांमध्ये उमटायला सुरूवात झाली होती.  सोमवारी रात्रीपासूनच शहरातील आंबेडकरी वस्त्या अस्वस्थ होत्या. मंगळवारी सकाळी वस्त्यांमधून आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर या शहरांत दगडफेक, रास्ता रोको, तोडफोडीचे काही प्रकार घडले.

पूर्व द्रुतगती मार्गासह ठिकठिकाणी रास्ता रोको, गोवंडी-चेंबूर येथे रेल रोको घडल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. आंबेडकरी जनतेचा प्रभाव असलेल्या घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, भांडुप, वरळीसह अन्य उपनगरांमधील दुकाने, व्यवहार, व्यवसाय बंद पाडण्यात आला. अनेक ठिकाणी बेस्ट बसेसची तोडफोड करण्यात आली. शहरात सर्वात जास्त तणाव चेंबूर आणि घाटकोपरमध्ये होता. या भ्याड हल्ल्यामागे असलेल्या संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंसह अन्य आरोपींविरोधात गुन्हा नोंद होत नाही, त्यांना अटक होत नाही तोवर रस्ता मोकळा करणार नाही, अशी भूमिका घाटकोपर रमाबाई नगर, कामराज नगरातील आंबेडकरी जनतेने घेतली होती. अशाच प्रकारचा रास्तारोको विक्रोळीच्या कन्नमवार नगरात करण्यात आला. चेंबूरमधील आंदोलकांनी चेंबूर नाका येथे सायन-पनवेल मार्ग रोखून धरला. पवईत आयआयटी संकुलासमोर चक्का जाम करण्यात आला. गोवंडी, चेंबूर रेल्वे स्थानकांमध्ये लोकल रोखण्यात आल्या. शहरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, गोवंडी, मानखुर्द, पवई या भागांमध्ये बेस्ट बसेस, खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी वाहनांच्या टायरमधील हवा काढण्यात आली.

. डोंबिवली स्थानकात तिकीट खिडकीची तोडफोड
. आंदोलनांमुळे मुंबईतील मल्टिप्लेक्समधले आणि सिंगल स्क्रिन थिएटरमधल्या चित्रपटांचे शो रद्द
. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकात आंदोलकांकडून तोडफोड, खुर्च्या, लाइट आणि पिण्याच्या पाण्याचे मशिन फोडले
. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प. मध्य रेल्वेवर ठाणे, घाटकोपर, विक्रोळी आणि डोंबिवलीत आंदोलन सुरू. पश्चिम रेल्वेवर दादर, एल्फिन्स्ट, गोरेगाव आणि मालाडमध्ये आंदोलन सुरू
. मुंबई विद्यापीठाकडून आजच्या परीक्षा रद्द; १३ विषयांचे पेपर पुढे ढकलले
. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या विरोधात जोरदार निदर्शने

मुंबईच्या सातरस्ता परिसरात शुकशुकाट महाराष्ट्र बंद आंदोलनाचा रस्ते वाहतुकीवर परिणाम; मुंबईतील रस्ते ओस पडले.

डोंबिवली स्थानकात तिकीट घराची तोडफोड
जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोडवरील वाहतूक सुरु
नागपूर येथे शताब्दी चौक, रिंग रोड येथे युवकांची घोषणा करत रिंग रोड बंद करण्याचा प्रयत्न.

दादर रेल्वे स्थानकात आंदोलकांची घोषणाबाजी


गोरेगाव येथे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखताना आंदोलनकर्ते

* दादर रेल्वे स्थानकात आंदोलक रेल्वे रुळावर

* एरव्ही गजबजलेला पवईतील या रस्त्यावरही आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments