Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रकांत पाटलांविरोधात विरोधाकांनी दिला "एकच" उमेदवार !

चंद्रकांत पाटलांविरोधात विरोधाकांनी दिला “एकच” उमेदवार !


भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपमध्ये नाराजी नाट्य पहायला मिळाले. आता कॉंग्रेस–राष्ट्रवादीकडून देखील पाटील यांना घेरण्यासाठी तिरकी चाल खेळण्यात आली आहे. मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना पाठींबा देण्याचा निर्णय आघाडीकडून जाहीर करण्यात आला आहे. यामुळे चुरस निर्माण होणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे आणि कॉंग्रेस नेते अभय छाजेड यांनी पत्रकार परिषद घेत मनसेला पाठींबा देण्याची घोषणा केली आहे. सर्व विरोधक एकवटल्याने पाटील यांची कोंडी होणार आहे.
कोथरूडच्या विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापत भाजपकडून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कुलकर्णी यांना उमेदवारी नाकारल्याने मतदारसंघातीलल ब्राम्हण संघटना आक्रमक झाल्या आहेत. या संघटनाकडून आपला उमेदवार येथे देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर आता कॉंग्रेस राष्ट्रवादीने मनसे उमेदवाराला पाठींबा देण्याची घोषणा केल्याने पाटील यांच्या अडचणी वाढणार आहेत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments