Placeholder canvas
Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईकाँग्रेस चे वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी रिपब्लिकन पक्षात यावे - केंद्रियराज्यमंत्री...

काँग्रेस चे वरिष्ठ नेते संजय निरुपम यांनी रिपब्लिकन पक्षात यावे – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई: संपूर्ण देशात काँग्रेस पक्षातील अनेक नेते काँग्रेस सोडत आहेत. महाराष्ट्रातीलही अनेक दिगग्ज काँग्रेस कार्यकर्ते नेते काँग्रेस पक्ष सोडून भाजप शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेत गर्दी वाढली आहे.काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्या सारख्या अनुभवी वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडण्याचा विचार केला असल्यामुळे त्यांनी अन्य कोणत्याही पक्षात जाण्यापेक्षा रिपब्लिकन पक्षात यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष असून रिपाइं मध्ये संजय निरुपम यांचा सन्मान करण्यात येईल याची आम्ही खात्री देतो. संजय निरुपम हे दोपहर का सामना चे कार्यकारी संपादक होते. शिवसेनेतुन ते राज्यसभा खासदार झाले. काँग्रेस चे मुंबई अध्यक्ष होते. उत्तर मुंबई तुन ते लोकसभा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांचा सारखा उत्कृष्ट वक्ता ; नेता ;कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षात आल्यास रिपब्लिकन पक्ष अधिक मजबूत होण्यास मोठी मदत होईल. रिपब्लिकन पक्षाने अनेकदा उत्तर भारतीयांची बाजू घेतली होती. त्यामुळे संजय निरूपम यांनी रिपब्लिकन पक्षात यावे त्यांचा रिपाइं मध्ये योग्य सन्मान होईल असे आवाहन रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले यांनी संजय निरुपम यांना केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments