काँग्रेसच्या ‘भारत जोडो यात्रे’च्या पंजाबमधील फतेहगढ साहिबमध्ये सुरु असलेल्या समर्थकांच्या मेळाव्याला संबोधित करताना बुधवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्रावर टीका केली. राहुल गांधी यांनी केंद्रावर हल्ला चढवला आणि म्हटले की, देशातील विविध जाती आणि भाषांचे लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने देशातील वातावरण बिघडत चालले आहे.’
“ते एका जातीला दुसर्या जातीविरुद्ध आणि एका भाषेला दुसर्या विरुद्ध लढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी देशातील सामान्य वातावरण खराब केले आहे,” असे राहुल गांधी भाजपवर हल्ला चढवत म्हणाले.
द्वेष, बेरोजगारी, महागाई आणि हिंसाचार यांच्याशी लढा देणे आणि प्रेम, एकता आणि बंधुतेचा संदेश देणे हे या यात्रेचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.
“आम्हाला वाटले की देशाला एक वेगळा मार्ग दाखवण्याची गरज आहे. प्रेम, एकता आणि बंधुता. यामुळेच आम्हाला यात्रेला सुरुवात करण्यास प्रवृत्त केले. आम्ही तुमच्यासोबत असू आणि पुढील १० दिवस तुमच्याशी संवाद साधू,” असे राहुल यांनी सांगितले.
मेळाव्याआधी बुधवारी काँग्रेस नेत्याने गुरुद्वारा फतेहगढ साहिबला भेट देऊन प्रार्थना केली. १९ जानेवारी रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचण्यापूर्वी आठ दिवसांत ही यात्रा पंजाबच्या अनेक भागांतून मार्गस्थ होईल.
कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याला तोंड देत, काँग्रेस पक्ष समर्थक आणि स्थानिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत आणि राहुल गांधी यांना पाठिंबा दिला. यात्रेने पंजाबमध्ये प्रवेश केल्यावर काँग्रेस नेत्याने मंगळवारी अमृतसरमधील सुवर्ण मंदिराला भेट दिली.
राहुल गांधी यांनी मंगळवारी हरियाणातील अंबाला येथे यात्रेला पुन्हा सुरू केली. सोमवारी ही यात्रा महिला आणि महिला सबलीकरणाला समर्पित करण्यात आली होती.
भारत जोडो यात्रा हरियाणात असताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खिल्ली उडवली आणि त्यांना २१ व्या शतकातील कौरव म्हटले. “२१ व्या शतकातील कौरव खाकी हाफ पँट घालतात आणि ‘शाखा’ चालवतात. त्यांच्या पाठीशी देशातील २-३ श्रीमंत लोक उभे राहिले आहेत,” असे Cयांनी कुरुक्षेत्र येथे सभेला संबोधित करताना सांगितले.
७ सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झालेली ही यात्रा ३० जानेवारी रोजी श्रीनगर येथे समाप्त होईल.
Web Title: Lokanna jati, bhashevarun ladhavnyacha prayatna: Rahul Gandhi yanchi Bhajapavar tika