Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeउत्तर महाराष्‍ट्रनाशिक'सहाव्या' बोटामुळे तरुणाला आधार कार्ड नाकारलं!

‘सहाव्या’ बोटामुळे तरुणाला आधार कार्ड नाकारलं!

नाशिक : हाताला सहा बोट आहे म्हणून आधार कार्ड मिळत नाही, असं तुम्हाला कुणी सांगितलं तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण हे खरंय, नाशिकचे रहिवासी गुरूदयाल त्रिखा यांच्या हाताच्या अंगठ्याला सहावं बोट असल्याने त्यांना आधार कार्डच मिळेनासं झालंय. हा तरूण आधार कार्डसाठी गेल्या सहा महिन्यांपासून आधार केंद्रावर चकरा मारतोय. मात्र डाव्या हाताला सहा बोट असल्याने फिंगर प्रिंट घेताना तांत्रिक अडचण येत असल्याने त्याला आधार कार्ड मिळत नाही.

खरंतर तुमच्या हाताला किती बोटं असावीत हे तुमच्या हातात नसतंच. कारण हे सहावं बोट जन्मजात असतं. चित्रपट अभिनेता ह्रितिक रोशनसह असंख्य जणांच्या हाताला सहा बोटं आहेत. तशाच पद्धतीने गुरूच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला जोडबोट आहे. त्यामुळे त्याच्या अंगठ्याचे ठसेच घेता येत नाहीत. मात्र आधार कार्ड काढताना केवळ पाच बोटांचेच ठसे घेतले जातात. सहावे बोट असल्यानं तांत्रिक अडचणी येत आहे. यावर उपाय म्हणून मग काही लोकांनी गुरूदयाल यांना अंपगाच्या कोट्यातून आधारकार्ड काढण्याचा सल्ला दिला. मात्र तो अंपग नसल्यानं या तरुणाला अपंगत्वाचंही प्रमाणपत्र मिळत नाही. त्यामुळे हा तरुण आधारकार्डसाठी हवालदिल झाला आहे. कारण आजकाल आधारकार्ड शिवाय कोणत्याच शासकीय योजनेचे फायदे मिळत नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments