Wednesday, June 26, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबादऔरंगाबादच्या छावणीत व्यावसायिकाची हत्या!

औरंगाबादच्या छावणीत व्यावसायिकाची हत्या!

महत्वाचे….
१.जमिनिच्या वादातून हत्येची शक्यता २.छावणी परिसरात मध्यरात्री घडला थरार ३. नागरिकांमध्ये दशहतीचे वातावरण ४. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचा शोध सुरु


औरंगाबाद: औरंगाबाद येथील छावणी परिसरात एका व्यावसायिकाचा अज्ञातांनी लोखंडी सळईच्या साहाय्याने खून केला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाल्याचा संशय छावणी पोलिसांनी व्यक्त केली आहे. हुसेन खान अलियार खान उर्फ शेरखान (रा. पेन्शनपुरा, औरंगाबाद) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

अधिक माहिती अशी, बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी लोखंडी सळईच्या साहाय्याने हुसेन खान यांच्यावर हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व खान यांना तात्काळ घाटी रूग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारापूर्वीच खान यांचा मृत्यू झाला होता. छावणी पोलिसांनी याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली जात आहे. प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments