skip to content
Friday, May 17, 2024
Homeदेशतिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावरुन गदारोळ‘

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयकावरुन गदारोळ‘

महत्वाचे…
१.रविशंकर प्रसाद म्हणाले, ‘ हे विधेयक म्हणजे महिलांचा सन्मान आहे
२.बीजेडी, आरजेडी आणि एमआयएमचा विधेयकाला विरोध


नवी दिल्ली : तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक आज कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत मांडलं. या विधेयकानुसार तिहेरी तलाक घेणाऱ्याला वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली गेली. यावेळी प्रसाद म्हणाले, ‘ हे विधेयक म्हणजे महिलांचा सन्मान आहे.बीजेडी, आरजेडी आणि एमआयएमचे प्रमुख बॅरीस्टर खासदार असदोदीन ओवैसी यांनी या विधेयकाला विरोध केला.

सुप्रीम कोर्टानं ऑगस्ट महिन्यात तिहेरी तलाकला बेकायदेशीर ठरवलं होतं. या विधेयकाला All India Muslim Personal Law बोर्डाचा विरोध कायम आहे. तिहेरी तलाक प्रतिबंधक कायदा तुम्ही आणणार का, आणलात तर ते बरं होईल, असं कोर्टानं सुचवलं होतं. या विधेयकानुसार, तोंडी तलाक देणं अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त ३ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक

– मुस्लिम महिला (विवाहसंबंधी हक्कांचं संरक्षण) विधेयक २०१७

– तोंडी तिहेरी तलाक (तलाक-ए-बिद्दत) कायद्यानं गुन्हा

– तीन वर्षांच्या कारावासाची तरतूद

– तिहेरी तलाक दिलेल्या महिलेला पोटगीची तरतूद

– महिला आपल्या मुलांचा ताबा मिळण्याची मागणी करू शकते

– मुलांच्या ताब्यावर न्याय दंडाधिकारी देणार निर्णय

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments