Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रगृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात

गृहराज्य मंत्री दिलीप केसरकर यांचा किरकोळ अपघात

वाहनाला एसटी बसचा धक्का लागल्याने किरकोळ अपघात झाला.
केसरकर सुखरूप असून, अपघातानंतर त्यांनी देवगड येथे दत्तमंदिरात जाऊन दर्शन घेतले व नंतर औरंगाबादकडे रवाना झाले.

औरंगाबादला जाताना देवगडला भेट देण्याचे केसरकर यांचा कार्यक्रम होता. मात्र उशीर होत देवगडची नियोजित भेट रद्द करून ते थेट औरंगाबादकडे निघाले. देवगड फाट्यापासून काही अंतरावरच केसकर यांच्या मोटारीला औरंगाबादकडे जात असलेल्या एसटी बसचा किरकोळ धक्का लागला. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने अनर्थ टळला.

या किरकोळ अपघातानंतर केसरकर यांनी आपला मोर्चा पुन्हा देवगडकडे वळविला. दरम्यान, बसचालकावर कारवाई न करण्याची सूचनाही त्यांनी नेवासे पोलिसांना दिली.

देवगड येथे जाऊन केसरकर यांनी दत्तमंदिरात दर्शन घेतले. देवगड संस्थानाचे प्रमुख भास्करगिरी महाराज यांनी त्यांचा सत्कार केला.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे केसरकर यांना
नेवासे तालुक्‍यात जनावरांच्या छावण्या सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यावर, शेतकरी व छावण्यांबाबत सरकार सकारात्मक असून, छावण्या सुरू करण्यात येतील, असे आश्‍वासन त्यांनी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास कोरडे, डॉ. अशोक ढगे यांना दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments