Placeholder canvas
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रपरीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून ११ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून ११ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

डोंबिवली – डोंबिवलीमध्ये ११ वर्षीय विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हिंदी विषयाच्या परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गोपाळ नगरमधील ही घटना आहे.

नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीला हिंदी विषयातील परीक्षेत कमी गुण मिळाले होते. त्यामुळे शिक्षिकेनं तिला फटकारले होते, ओरडल्यादेखील होत्या व मुख्याध्यापिकेकडे घेऊन गेल्या होत्या. यावेळी मुख्याध्यापिकांनी मुलीला पालकांना शाळेत घेऊन येण्यास सांगितले होते. पालकांना शाळेत बोलावल्यानं ती तणावाखाली होती. मात्र घरातल्यांना याबाबत तिनं काहीही सांगितले नाही. मात्र याच तणावाखाली तिनं आत्महत्या केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments