Saturday, July 20, 2024
Homeमहाराष्ट्रनवी मुंबईत ९ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक

नवी मुंबईत ९ नोव्हेंबरला महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक

नवी मुंबई – महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक ९ नोव्हेंबरला होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज  अर्ज दाखल करण्यात येत आहेत. महापौरपदासाठी शिवसेनेचे सोमनाथ वास्कर आणि उपमहापौरपदासाठी द्वारकानाथ भोईर यांनी अर्ज भरला आहे. काँग्रेसच्या वैजयंती दशरथ भगत यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज भरला. दरम्यान, काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद झाल्याचे पाहायला मिळालं कारण मंदाकिनी म्हात्रे यांनीही उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला आहे.  तर महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे.डी.सुतार यांनी अर्ज दाखल केला आहे.

दरम्यान, काँग्रेसमध्ये सर्वात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. जिल्हाध्यक्षांच्या पत्नी वैजयंती दशरथ यांनी बंडखोरी करुन उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला असला तरी त्यांची नाराजी दोन दिवसांत दूर केली जाईल, अशी प्रतिक्रिया यावेळी काँग्रेस निरीक्षक भाई जगताप यांनी दिली.
दरम्यान, निवडणुकीमध्ये दगाफटका बसण्याची शक्यता असल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादीने समर्थकांसह सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले आहे. नवी मुंबई महापालिकेवर गणेश नाईक यांची सत्ता कायम राहणार की, शिवसेना भगवा फडकविणार, याविषयी उत्सुकता शहरवासीयांमध्ये निर्माण झाली आहे. निवडणुकीमध्ये सत्ताधारी व विरोधकांनी एकमेकांची मते फोडण्याची रणनीती आखली आहे. दगाफटका बसू नये, यासाठी शिवसेना व राष्ट्रवादीने त्यांचे नगरसेवक अज्ञातस्थळी रवाना केले आहेत.

भाजपाच्या भूमिकेकडे लक्ष
सर्वांचे लक्ष शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेससह अपक्षांच्या भूमिकेकडे लागले आहे. भाजपाच्या सहा नगरसेवकांना महत्त्व दिले जात असून, त्यांचीच भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments