Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल!

सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल!

उस्मानाबाद   भाजप-शिवसेना सरकार विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा सुरु झाली आहे. तुळजापूरच्या आई भवानीचा आशीर्वाद घेत आजपासून मराठवाडयात हल्लाबोल यात्रेला प्रारंभ झाला. विदर्भात १५५ किलोमीटरची यवतमाळ ते नागपूर अशी सरकारविरोधी हल्लाबोल पदयात्रा काढल्यानंतर आत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मराठवाडयावर लक्ष केंद्रीत करत इथल्या समस्या सोडविण्यामध्ये सरकारच्याविरोधात हल्लाबोल यात्रेचे आयोजन केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या #हल्लाबोल यात्रेच्या पहिल्या दिवशी #उस्मानाबाद येथील सभेस सुरुवात … @supriya_sule pic.twitter.com/sOe619GSHu

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार राणा जगजितसिंग पाटील आदींसह मराठवाडयातील सर्व आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

तुळजापुरात भवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार असून त्यानंतर भव्य सभा होणार आहे. या सभेनंतर संध्याकाळी उमरगा येथे जाहीर सभा होणार आहे. मराठवाड्यात ८ जिल्ह्यात २७ तालुक्यात जवळपास १८०० किलोमीटरचा प्रवास होणार असून १० दिवसात २७ जाहीर सभा , मोर्चे, भेटी असा कार्यक्रम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ३ फेब्रुवारीला औरंगाबाद शहरात शेवटची जाहीर सभा होणार आहे.

अशी असेल हल्लाबोल यात्रा

दिनांक १७ जानेवारी: सकाळी ११ वाजता भूम, दुपारी ४ वाजता पाटोदा,सायंकाळी ७ वाजता बीड.

१८ जानेवारी: सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव, सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई.

१९ जानेवारी: सकाळी ११ वाजता औसा, दुपारी ४ वाजता उदगीर, सायंकाळी ७ वाजता अहमदपूर.

२० जानेवारी: सकाळी ११ वाजता लोहा, दुपारी ३ वाजता गंगाखेड, सायंकाळी ७ वाजता परळी.

२१ जानेवारी: दुपारी १ वाजता उमरी, सायंकाळी ५ वाजता माहुर.

२२ जानेवारी: सकाळी ११ वाजता हिंगोली, दुपारी ४ वाजता वसमत, सायंकाळी ७ वाजता परभणी.

२३ जानेवारी: सकाळी ११ वाजता पाथरी, दुपारी ४ वाजता सेलू, सायंकाळी ७ वाजता मंठा.

२४ जानेवारी: सकाळी ११ वाजता जाफराबाद, दुपारी ३ वाजता घनसावंगी, सायंकाळी ७ वाजता बदनापूर.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments