Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात बंदला हिंसक वळण!

राज्यात बंदला हिंसक वळण!

मुंबई: भीमा कोरेगावच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी भारिप बहुजन महासंघासह इतर संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या बंदला मुंबईसह राज्यात इतर ठिकाणी जाळपोळ,रास्ता रोको,तोडफोडीच्या घटना वगळता राज्यभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. मात्र बंदला हिंसक वळण लागले.

मुंबई बंदमुळे तब्बल नऊ तास ठप्प होती. रेल्वेसेवा,मेट्रो सेवा विस्कळीत झाली होती. तर रस्त्यावर वाहतूक अडविण्यात आली होती. तसेच टॅक्सी,रिक्षा,स्कूल बस,डबेवाल्यांनी आपला कारभार बंद ठेवला होता. मात्र बिनडोक मुंबई विद्यापिठाने दुपारपर्यंत परिक्षा घेतल्या जातील  या तोऱ्यात परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला नव्हता.मात्र दुपार नंतर परिक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला. तर राज्य शासनाच्या शिक्षण विभागानेही शाळांना सुट्     या जाहीर केल्या नव्हता. मात्र पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी म्हणून शाळेत पाठविले नव्हते. आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करुन आपला निषेध व्यक्त केला. डोंबिवली येथे तिकिट घराच्या काचा फोडण्यात आल्या. तर ठाण्यात शिवसेनेच्या शाखा कार्यालयाचे कार्यालयावर हल्ला करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना बऱ्याच ठिकाणी दबावतंत्राचा वापर करुन व्यवसाय,प्रतिष्ठाने बंद करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे आंदोलनकर्त्यांना कोणत्याही ठिकाणी पोलिसांनी रोखले नाही. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे आंदोलन सर्वत्र यशस्वी झाले मात्र नागरिकांचे मोठे हाल झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments