Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत मानखुर्दमध्ये स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

मुंबईत मानखुर्दमध्ये स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग

मुंबई : मानखुर्दमधील मंडाळा परिसरात एका स्क्रॅप कंपाऊंडला भीषण आग लागली आहे. आज दुपारी वाजण्याच्या सुमारास ही आग लागली असून अग्नीशमन दलाच्या १० ते १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्‍याचे प्रयत्‍न सुरु आहेत. या परिसरात केमिकल आणि भंगाराची गोदामे असल्‍यामुळे आग पसरण्‍याचा धोका आहे. ही आग पसरु नये म्‍हणून अग्निशमन दलाकडून कसोशिने प्रयत्‍न केले जात आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments