Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातील तरुणाचा चीनी समलैंगिक मित्राशी विवाह

महाराष्ट्रातील तरुणाचा चीनी समलैंगिक मित्राशी विवाह

यवतमाळ – जिल्ह्यात पहिल्यांदाच एक समलैंगिक विवाह नुकताच पार पडला. अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या शहरातील एका प्रतिष्ठीत व्यावसायिकाच्या मुलाने विदेशातील आपल्या समलैंगिक मित्रासोबतच विवाह केला आहे. सध्या हा विवाह शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, या विवाहाला वराच्या आईचा प्रचंड विरोध असल्याने गुरुवारी काही मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला. महाराष्ट्रातील तरुणाचा विदेशात समलैंगिक विवाह करण्याची पहिलच घटना आहे अशी चर्चा सुरु आहे.

शहरातील प्रसिद्ध पुस्तक विक्रेत्यांचा मुलगा अमेरिकेत नोकरीला आहे. त्याला तेथे गलेलठ्ठ पगाराची नोकरी आहे. अमेरिकेत वास्तव्य आणि मोठ्या पॅकेजची नोकरी असल्याने त्याला मुलगी द्यायला कोणीही एका पायावर तयार होते. परंतु, तो लग्नास नकार देत असल्याने घरच्यांची काळजी वाढली होती. लग्नास नकार देण्याचे कारण त्याला विचारले असता, त्याने आपण समलैंगिक विवाह करणार असल्याचे सांगितले. तेव्हा मात्र, त्याच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु, नाईलाजास्तव त्याच्या कुटुंबियांनी या लग्नास होकार दिला. नवरदेवाच्या आईचा मात्र या लग्नास विरोध होता. त्यामुळे मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थित हा विवाह करण्याचे ठरले.
या समलैंगिक मित्रांच्या विवाहासाठी शहरातील एक हॉटेल ‘बुक’ करण्यात आले होते. या विवाहात सर्वच वैदिक चालीरिती पाळण्यात आल्या. लग्नापूर्वी दोघांनाही हळद लावण्यात आली. त्यानंतर वर-वधुंप्रमाणे सजविण्यात आले. हार तुरे बांधण्यात आले. त्यासाठी लग्नाचे वस्त्रही खास दुकानातून मागविण्यात आले. एकमेकांना अंगठी व हार घालून वैदिक मंत्रोच्चारात हे लग्न पार पडले. या लग्नाची चर्चा कुठेही होऊ नये, याची सर्व नातेवाईकांना जणूकाही ताकीदच देण्यात आली होती.
या समलैंगिक विवाहातील एक जोडीदार तरुण हा चीनमधील असून तोदेखील अमेरिकेतच राहतो. दोघेही एकाच कंपनीत नोकरीला असून दोघांनाही मोठ्या पगाराच्या नोकर्‍या आहेत. काही दिवस ’लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहिल्यावर त्यांनी आपला निर्णय कुटुंबीयांना सांगितला. अखेर नातेवाईकांनी त्यांच्या आयुष्याचा विचार करून त्यांना विवाहबंधनात बांधून दिले.मात्र या विवाहशी जोरदार चर्चा रंगली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments