Monday, May 13, 2024
Homeमहाराष्ट्रमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सज्ज!

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सज्ज!

मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे सज्ज झाली असून ६ डिसेंबरला दादरला येणाऱ्या आंबेडकर अनुयायांसाठी जादा लोकल फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ५ डिसेंबर मंगळवारच्या मध्यरात्रीपासून १२ विशेष लोकल चालवण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर दादर ते कुर्ला, ठाणे, कल्याण तसेच हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्द, वाशी आणि पनवेल या स्थानकादरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो आंबेडकर अनुयांयासाठी रेल्वे प्रशासन ५ डिसेंबरला मध्यरात्रीपासून विशेष रेल्वे सेवा सुरू करेल. त्या दिवशी मंगळवारी मध्यरात्री १ वाजून १५ मीनिटांनी दादर आणि ठाणे, २.२५ वाजता दादर-कल्याण, पहाटे ३ वाजता दादर-कुर्ला विशेष लोकल चालवण्यात येणार आहे.
या विशेष सेवेमध्ये अप दिशेला कुर्ला-दादर लोकल रात्री १२.४५ वाजता,  कल्याण दादर रात्री १ वाजता, ठाणे ते दादर रात्री २.१० वाजता हार्बर मार्गावरून सुटेल. तर डाऊन मार्गावर कुर्ला-मानखुर्द रात्री २.३० वाजता तर अप ३.१० वा कुर्ला पनवेल डाऊन सकाळी ३ वाजता तर अप मध्यरात्री १.४० वाजता, वाशी-कुर्ला अप रात्री १.३० वाजता तर डाऊन सकाळी ४ वाजता सुटेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments