Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeपश्चिम महाराष्‍ट्रपुणेमंत्रिपदाचा विस्तार करताना नारायण राणे यांचा विचार : दानवे

मंत्रिपदाचा विस्तार करताना नारायण राणे यांचा विचार : दानवे

पुणे : मंत्रिपदाच्या आश्वासनावर भाजमध्ये दाखल झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना विधान परिषद अथवा मंत्रिपदाचे कोणत्याही प्रकारचे आश्वासन दिले नसून एनडीएच्या विस्ताराप्रसंगी त्यांचा मंत्रिपदाचा विचार करण्यात येईल, असे संकेत भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि खासदार रावसाहेब दानवे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

नारायण राणे यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांच्या एका रिक्त जागेसाठी आज अर्ज भरण्यात आला. यावेळी नारायण राणे यांना भाजपाकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारत भाजपा उपाध्यक्ष प्रसाद लाड यांना जाहीर केली. यामुळे राणे नाराज झाल्याचे पाहावयास मिळत आहे. तर रावसाहेब दानवे हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
लवकरच मध्यवधी निवडणुका होणार असे शिवसेना या मित्र पक्षाकडून सांगितले जात आहे. या प्रश्नावर रावसाहेब दानवे म्हणाले, की लोकसभा आणि विधानसभेचा ५ वर्ष कार्यकाळ भाजपा पूर्ण करेल, तसेच मध्यावधी निवडणुकांचा त्याचा अंदाज असेल अशा शब्दात शिवसेनेचे हे आरोप फेटाळून त्यांनी लावले.

राज्यातील शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफीची रक्कम मिळाली नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रश्नावर ते म्हणाले, की काही ठिकाणी  शेतकऱ्यांना रक्कम राहिली असेल, मात्र या महिन्या अखेरपर्यंत सर्व शेतकरी कर्ज माफीचे लाभार्थी होतील. मागील महिन्याभरापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा आणि नाना पटोले हे भाजपाविरोधात विधान करीत आहेत. त्यांच्याविषयी पक्ष काय भूमिका घेणार या प्रश्नाबाबत ते म्हणाले, की यशवंत सिन्हा हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या बाबत मी काही बोलणार नाही. तर नाना पटोले यांच्या विधाना बाबत तूर्तास तरी कारवाई नाही. मात्र पक्षाने गांभीर्याने घेतले आहे. त्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे त्यांनी संकेत दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments