Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रबंदीनंतरही जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री!

बंदीनंतरही जीवघेण्या नायलॉन मांजाची विक्री!

मुंबई- नायलॉन मांजावर न्यायालयाची बंदी असल्यानंतर बंदी घालण्यात आली, तरीही राज्यात पोलिसांच्या डोळ्यादेखत नायलॉन मांजाची विक्री सुरू आहे. याकडे शासन,पोलिस दुर्लक्ष करत असल्यामुळे हा प्रकार जीवघेणा बनला आहे.

मुंबईसह राज्यात, जिल्हा व तालुकास्तरावर नायलॉन मांजाची सर्रास बेकायदा विक्री सुरू आहे. शहर व ग्रामीण भागातही विक्रिचा व्यवसाय जोरात सुरु आहे.शहरासोबतच ग्रामीण भागातही बेकायदा नायलॉन मांजा विकला जातो आहे. सुरुवातीला  मांजा विक्रेते ग्राहकांची चाचपणी करतात, मगच नायलॉन मांजाची विक्री करतात. तरुणांना नायलॉन मांजासाठी नकार देणारे विक्रेते शाळकरी मुलांना मात्र सहज नायलॉन मांजा देतात. हा प्रकार जीवघेणा असून त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहेत. याला कधी रोखले जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
नायलॉन मांज्या विक्री करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतुद आहे. यात बेकायदा नायलॉन मांजा विकणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि एक लाखांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. पण बेकायदा मांजा विकणाऱ्यांना याचा धाक आहे, असे नागपुरात तरी दिसत नाही. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या मदतीने बेकायदा नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करु असे सांगतात. पण प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. यामुळे नागरिकांध्ये चिंता वाढली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments