Placeholder canvas
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रनाताळात फिरण्यासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

नाताळात फिरण्यासाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या

मुंबई – डिसेंबरमधील नाताळच्या सुट्टीत मध्य रेल्वेने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्या मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी आणि सावंतवाडी तसेच अजनी ते करमाळी दरम्यान धावतील.यामुळे प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल.

नाताळाच्या सुट्टीत पर्यटक गोव्याला जास्त पसंती देतात. नाताळची सुट्टी तसेच नवीन वर्षाचे स्वागत गोव्यात साजरे करण्याची प्रथाच गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. देशाविदेशातून पर्यटक गोव्याला जातात. मुंबईतून तसेच नागपूर येथून गोव्याला तसेच कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेने एलटिटी – करमाळी (०१०४५) ही विशेष गाडी २१ आणि २८ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजून १० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी सकाळी ११ वाजता करमाळीला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी १ वाजता करमाळीहून निघून रात्री १२.२० ला मुंबईत येईल. एलटीटी-सावंतवाडी (०१०३७) ही विशेष गाडी २५ डिसेंबर आणि १ जानेवारीला मध्यरात्री १.१० ला सुटून त्याच दिवशी १०.३० ला सावंतवाडीला पोहोचेल. परतीसाठी २५ डिसेंबर आणि १ जानेवारीला दुपारी १२.०५ ला निघून रात्री १२.२० ला मुंबईत पोहचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
अजनी-करमाळी (०१११९) ही गाडी १८ आणि २५ डिसेंबर आणि १ जानेवारी संध्याकाळी ७.५० ला सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० ला पोहचेल. परतीच्या प्रवासासाठी १९, २६ डिसेंबर तसेच २ जानेवारी २०१८ ला रात्री ९.३० ला सुटून दुसऱ्या दिवशी अजनीला रात्री १० वाजता पोहोचेल. या गाडीला वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम येथे थांबा देण्यात आला आहे. पर्यटकांची कोकण आणि गोव्याला पसंती असल्याने या गांड्यामुळे पर्यटकांना फायदा होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments