skip to content
Friday, May 17, 2024
Homeमराठवाडाऔरंगाबाददुचाकीला धडक दिल्याने दोन ठार एक गंभीर

दुचाकीला धडक दिल्याने दोन ठार एक गंभीर

औरंगाबाद : पेट्रोलपंपा वर काम करणाऱ्या मित्राला घेऊन ट्रिपलसीट घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला व एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास मिठमिठा येथील मदरशा समोर घडली. ठार झालेले दोन्ही तरुण एकुलते एक होते त्यांचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ होत आहेत.

शुभम सुरेश राऊत वय २१( रा नंदनवन कॉलोनी), श्रीकांत शिवाजी हिवाळे वय २३ ( पाडेगाव) असे अपघातात मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. व आकाश रमेश सोनवणे वय २६ (रा. माजीसैनिक कॉलोनी, पाडेगाव) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आकाश हा शरणापूर फाटा येथील एका पेट्रोलपंपा वर काम करीत होता रात्री पंपावरील ड्युटी संपल्यानंतर त्याच्या जवळ मोटारसायकल नसल्याने शुभम व श्रीकांत हे दोघेही शुभमच्या एमएच २० डिजी २४५९ या दुचाकी वरून आकाश ला घेऊन येण्यासाठी गेले होते तेथून त्यांनी आकाशला घेतले. तिघेही दुचाकीवरून औरंगाबाद च्या दिशेने निघाले. दरम्यान मिठमिठा येथील एका मदरशा समोर एका अज्ञात भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली . धडकेत तिघेही दूरवर फेकल्या गेले, डोक्यावर गंभीर जखमी होऊन अति रक्तस्त्राव झाल्याने शुभम आणि श्रीकांत दोघेही जागीच ठार झाले. हा भीषण अपघात पाहून परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलीसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही तरुणांना घाटी रुग्णालयात हलविले मात्र तेथे तपासून वैधकीय अधिकाऱ्यांनी दोघांना मृत घोषित केले व आकाश वर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची परिस्तिथी गंभीर आहे. दोन जिवलग मित्राच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद घेण्यात आली आहे.अज्ञात वाहनधारकाच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments