Placeholder canvas
Saturday, May 11, 2024
Homeदेशसर्वसामान्य कार्यकर्ताही घेऊ शकतो राहुल गांधींची भेट

सर्वसामान्य कार्यकर्ताही घेऊ शकतो राहुल गांधींची भेट

नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आठवडयातून एकदिवस कार्यकर्त्यांसाठी राखून ठेवण्याची पक्षाची जुनी परंपरा पूनर्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधींनी बुधवारी नवी दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेसच्या मुख्यालयात देशभरातील पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. राहुल गांधींचे कार्यालय आठवडयातून एकदिवस .३० ते ११ या वेळेत पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसाठी खुले असेल. सर्वसामान्य कार्यकर्ताही राहुल गांधींना भेटू शकेल.

पक्ष कार्यकर्त्यांना वेळ घेऊन राहुल गांधींची भेट घेता येईल. या चर्चेच्यावेळी तिथे प्रसारमाध्यमांना प्रवेश मिळणार नाही असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. राहुल सकाळी सव्वानऊच्या सुमारास अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात आले व त्यांनी दिल्ली, राजस्थान आणि कर्नाटकातून आलेल्या पक्षाच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेतली. कर्नाटकमध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. राहुल गांधी यांची आई सोनिया गांधी त्यांच्या कार्यकाळात १० जनपथ निवासस्थानी फक्त महत्वाच्या बैठकांना मार्गदर्शन करायच्या. राहुल यांना ही व्यवस्था मोडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचायचे आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments