Placeholder canvas
Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रदादर रेल्वे स्थानकावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे लावले फलक

दादर रेल्वे स्थानकावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसचे लावले फलक

महत्वाचे…
१.दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी करत भीम आर्मी संघटनेने केले आंदोलन
२.बाबासाहेबांचे नाव रेल्वेस्थानकाला दिले नाही तर मुख्यमंत्री,रेल्वेमंत्र्यांचे कार्यक्रम उधळून लावण्याची मागणी
३.दरवर्षी रेल्वेस्थानकाच्या नावासाठी होते मागणी


मुंबई – दादर रेल्वे स्थानकाचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस करण्याची मागणी करत भीम आर्मी संघटनेने बुधवारी आंदोलन केले. दादरच्या पूर्व व पश्चिम उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या काही फलाटांसह पादचारी पूलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसनावाचे पोस्टर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

मुख्यमंत्री आणि रेल्वेमंत्री यांनी येत्या आठवड्याभरात यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर त्यांचे सर्व कार्यक्रम उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी माध्यमांशी बोलतांना दिला आहे. यापूर्वी दादर रेल्वेस्थानकाच्या नावावरुन राजकीय पक्षांमध्ये वाद झाला होता. काही पक्षांनी चैत्यभूमी नाव ठेवण्याची मागणी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments