Placeholder canvas
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे - देवेंद्र फडणवीस

गुजरात, हिमाचल प्रदेशमधील विजय मोदींवरील विश्वासामुळे – देवेंद्र फडणवीस

नागपूर – गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

जनता भाजपासोबत असून मोदींचे विकासकारण देशाला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत विरोधात वारे वाहत असतानाही राज्यातील सत्ता टिकवण्यात  भाजपाने यश मिळवले आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसच्या हातून सत्ता खेचून आणण्यात भाजपाना यशस्वी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. “विकास आणि विश्वासाला गुजराती जनतेने पाठिंबा दिला आहे. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाला मिळालेला विजय हा जनतेच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असलेल्या विश्वासामुळेच मिळाला आहे.” असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments