Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह ८ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह ८ कार्यकर्त्यांना जामीन मंजूर

मुंबई – मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यासह पक्षाच्या ६ कार्यकर्त्यांना मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडप्रकरणी आज न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या कार्यकर्त्यांना एक महिनाभर दर आठवड्याला आझाद मैदान पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी मुंबई काँग्रेस ऑफिसची तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी मनसेने घेतली होती. त्याचबरोबर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी चिथावणीखोर ट्विटही केले होते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप देशपांडेंसह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरीश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक केली होती.
पोलिसांनी या कार्यकर्त्यांना न्यायालयात उभे केल्यानंतर न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. न्यायालायने या कार्यकर्त्यांची रवानगी भायखळा कारागृहात केली होती. दरम्यान बुधवारी सुनावणीत त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला होता. मात्र आज १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments