Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकमला मिल: 'मोजो' हॉटेल मालकांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक, निरुपमांचा आरोप!

कमला मिल: ‘मोजो’ हॉटेल मालकांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक, निरुपमांचा आरोप!

Sanjay Nirupam, Nirupam, Congress, MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray, Tiger Zinda Hai, Deva

मुंबई – कमला मिल मधल्या मोजो या आग लागलेल्या हॉटेलचे मालक हे नागपूरचे असून, एका स्थानिक आमदाराच्या मध्यस्थीने या मालकांची मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाल्याचा खळबळजनक आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. मुंबई प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत निरुपम बोलत होते.

सरकार या हॉटेल मालकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मोजो या हॉटेलचे सहा मालक आहेत, त्यापैकी पाच जण नागपूरचे आहेत, असा दावा ही  निरुपम यांनी केला आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता या आगीला कारणीभूत आहेत, अन सरकारने त्यांच्याकडेच चौकशी सोपवली आहे. मुख्यमंत्र्यांनी मेहता यांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांना निलंबित करुन चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. हे प्रकरण दडपण्यासाठीच मेहता यांच्याकडे चौकशी दिली असल्याचा आरोप निरुपम यांनी केला.
कमला मिल आग प्रकरणी बोलताना आयुक्त मेहता यांनी विरोधीपक्षाच्या एका नेत्याने फोन करून संबंधित हॉटेलवरील कारवाई रोखली होती, असा गौप्य्स्फोट केला होता. त्यानंतर मेहता यांच्यावर निरुपम यांनी टीकेची झोड उठवली होती, आजही निरुपम यांनी मेहता यांना लक्ष केले. आयुक्त पदाच्या महत्त्वपूर्ण जबाबदारीवर मेहता आहेत, त्यांनी मोघम वक्तव्य करू नये. त्यांनी आपली जबाबदारी ओळखून बोलावे, फोन कुणी आणि कोणासाठी केला हे मेहता यांनी स्पष्ट करावे, असेही निरुपम म्हणाले. कमला मिल आग प्रकरणी आतापर्यंत केवळ एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. सरकार याप्रकरणी धीम्या गतीने का कारवाई करत आहे, याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करावा असेही त्यांनी म्हटले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments