Placeholder canvas
Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रकमला मिल प्रकरण: मोजोस बिस्ट्रोचा एक फरार मालक सापडेना!

कमला मिल प्रकरण: मोजोस बिस्ट्रोचा एक फरार मालक सापडेना!

महत्वाचे…
१.युग तुलीच्या अटकपूर्व जमीनाबाबत येत्या ११ जानेवारीला २. शोधण्यासाठी पोलिसांची ७ पथके बनविण्यात आली ३. काही दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर युग तुली दिसल्याची चर्चा


मुंबई – कमला मिल आग दुर्घटनेसंदर्भात मोजोस बिस्ट्रोच्या मालकांपैकी एक असलेला युग तुली याला शोधण्यासाठी पोलिसांची ७ पथके बनविण्यात आली आहेत. ४ पथके महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी युग तुली याचा शोध घेत असून उर्वरित ३ पथके राज्याच्या बाहेर पाठविण्यात आली आहेत. मात्र आरोपी पोलिसांना सापडत नाही की राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस कारवाई करत नाही अशी चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी हैदराबाद विमानतळावर युग तुली दिसल्याची माहिती समोर आली होती. युग तुलीच्या नातेवाईकांकडे युग तुली संदर्भात सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी मुंबईतल्या सत्र न्यायालयात युग तुलीच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या संदर्भात सुनावणी दरम्यान कमला मिल मधील मोजोस हॉटेलच्या मालकांपैकी युग तुली याला न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. युग तुलीबाबत न्यायालयाने पोलिसांना कुठलेही आदेश दिलेले नसून युग तुलीला पोलीस कधीही अटक करू शकतात. युग तुलीच्या अटकपूर्व जमीनाबाबत येत्या ११ जानेवारीला मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments