Monday, May 27, 2024
Homeमहाराष्ट्रमनसेचे ते ‘सहा’ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

मनसेचे ते ‘सहा’ नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?

मुंबई महापालिकेत लवकरच आमचा महापौर बसवू अशी बतावणी करणाऱ्या भाजपला शिवसेनेनं जोरदार धक्का दिला. मुंबई महापालिकेत मनसेचे सहा नगरसेवक वेगळा गट तयार करुन शिवसेनेसोबत जाणार आहे. या प्रकारामुळे महापालिकेच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. या घडामोडीमुळे भाजपा आणि मनसेला चांगला धक्का बसला.

शिवसेनेसोबत जाणारे 6 मनसे नगरसेवक कोण?

अर्चना भालेराव – वॉर्ड 126

परमेश्वर कदम – वॉर्ड 133

अश्विनी मतेकर- वॉर्ड 156

दिलीप लांडे – वॉर्ड 163

हर्षल मोरे – वॉर्ड 189

दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197

हे सहाही नगरसेवक कोकण आयुक्त कार्यालयात पोहचले असून वेगळ्या गटाची नोंदणी करणार आहेत. त्यामुळे आता शिवसेनेचं महापालिकेतील संख्याबळही वाढणार आहे.

भांडुप पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या पराभवनंतर भाजप बरीच आक्रमक झाली होती. लवकरच मुंबईत आमचा महापौर बसवू असं वक्तव्य भाजपकडून करण्यात येत होती. त्यानंतर शिवसेनेत घडामोडींना प्रचंड वेग आला. या सर्व घडामोडीत शिवसेनेचे आमदार अनिल परब आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

शिवसेनेकडून घोडेबाजार:

मनोज कोटक शिवसेनेकडून हा घोडेबाजार सुरु आहे, भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी लाचलुचपत विभाग, कोकण आयुक्त आणि पोलिसांकडे तक्रार दिली आहे. जनताही शिवसेनेचा हा घोडेबाजार पाहात आहे. आम्ही शिवसेनेच्या या घोडेबाजाराचा पर्दाफाश करु, अशी प्रतिक्रिया भाजप गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments