मुंबई: फटाकेबंदीच्या वादात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उडी घेतली आहे. हिंदू सण साजरे करण्यावरच बंदी का येते, असा प्रश्न उपस्थित करत आता फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील फटाकेबंदीवर आपलं मत मांडलं. फटाकेबंदीला आमचा विरोध आहेच असेही त्यांनी यावेळी त्यांनी ठणकावून सांगितलं. नवी दिल्लीपाठोपाठ मुंबईतही फटाके विक्रीचे परवाने रद्द करण्याचे आदेश मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. निवासी भागातील फटाके विक्रीवर न्यायालयानं बंदी घातली असून, आदेशाचं पालन न केल्यास कडक कारवाई करू, असंही यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
फटाके काय फक्त व्हॉट्सअॅपवरच फोडायचे का? राज ठाकरे
RELATED ARTICLES