मुंबई : रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर महिलेची प्रसुती झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. दादर स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर सोमवारी रात्री सव्वा दहा वाजता महिलेने मुलीला जन्म दिला.
सलमा शेख असं या महिलेचं नाव आहे. दादर स्टेशनवर असेलल्या वन रुपी क्लिनिकचे डॉक्टर प्रज्वलित आणि महिला जीआरपी यांच्या मदतीने सलमा यांची प्रसुती करण्यात आली.
रेल्वे स्टेशनवरच सलमा यांना प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यानंतर इतर प्रवाशांनी मदतीसाठी जीआरपी अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. आई आणि बाळ सुखरुप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
रेल्वे स्टेशनवर महिलेची प्रसुती होण्याची ही या वर्षातील दुसरी घटना आहे. यापूर्वी घाटकोपर स्टेशनवरही महिलेने बाळाला जन्म दिला होता, असं वन रुपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले यांनी सांगितलं.