skip to content
Friday, May 24, 2024
Homeमहाराष्ट्रगँगस्टर डी. के. राव पोलिसांच्या जाळ्यात!

गँगस्टर डी. के. राव पोलिसांच्या जाळ्यात!

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक डी. के. राव याला अटक करण्यात आली आहे. खंडणीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने डी. के. राववर अटकेची कारवाई केली. अँटॉप हिलच्या एसआरए कन्सल्टंटला धमकावून ५० लाखांची मागणी डी. के. रावने केली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरच्या अटकेनंतर आता डी. के. रावच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. डी. के. रावचा अधिकाधिक कालावधी तुरुंगातच गेला असून, २०१६ साली तो जामिनावर तुरुंगाबाहेर आला होता.

डी. के. रावचं मूळ नाव रवी मल्लेश वोरा आहे. काही वर्षांपूर्वी इन्स्पेक्टर मदुला लाड यांच्यासोबतच्या चकमकीत डी. के. राव जखमी झाला होता. त्यावेळी त्याच्या खिशात बँकेचं बनावट आयकार्ड मिळालं होतं. त्यावरील नाव डी. के. राव असे होते. तेव्हापासून तो डी. के. राव या नावानेच अंडरवर्ल्डमध्ये ओळखला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments