मुंबई: ठाण्यातील खंडणी वसुली प्रकरणी दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्यासह ५ जणांविरोधात मोक्का कायद्यांतर्गंतही गुन्हा दाखल करण्यात आलाय. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय. ठाण्यातील बिल्डर खंडणी वसुली प्रकरणात इक्बाल कासकर, छोटा शकील, पंकज गांगर, इसरार आणि मुमताझ अशा एकूण ५ जणांवर मोक्का मोक्का लावला गेलाय.
दरम्यान, इक्बाल कासकर हा गुटखा व्यवसायातही उतरण्याच्या प्रयत्नात होता. याकामी त्याला काही व्यापारीही मदत करणार होते. पोलिसांच्या तपासात ही माहिती समोर आलीय. इक्बाल कासकर सध्या ठाणे पोलिसांच्या कोठडीत आहे.