Sunday, May 19, 2024
Homeलाईफस्टाइल‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’ विषयावर ‘दिलखुलास’ मध्ये मुलाखत

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘कशी कराल स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. मीनल मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून मंगळवार दि. १६, बुधवार दि. १७, आणि गुरुवार दि. १८ आणि शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला कधी सुरुवात करावी, या परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम, सराव चाचण्यांचे महत्व आदी विषयांची माहिती श्रीमती मापुस्कर यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments